Useful Resources for NGOs – Swachha Bahuuddeshiya Sanstha https://swachha.net Swachha Bahuuddeshiya Sanstha Sun, 23 Jan 2022 14:42:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 214862343 Useful Resources for NGOs – Rang De peer to peer lending and social investing platform https://swachha.net/2022/01/23/useful-resources-for-ngos-rang-de-peer-to-peer-lending-and-social-investing-platform/ https://swachha.net/2022/01/23/useful-resources-for-ngos-rang-de-peer-to-peer-lending-and-social-investing-platform/#respond Sun, 23 Jan 2022 14:42:50 +0000 https://swachha.net/?p=94 मी काही वर्षांपूर्वी Rang De या peer to peer lending platform बद्दल एकले होते, त्यांच्याबद्दल थोडी माहितीही पाहीली होती. व भविष्यात ते आपल्याला व इतरांना उपयोगी पडू शकेल असे मला वाटलेही होते. पण नंतर गरज पडली नाही म्हणून मग याबद्दल विसरून गेलो. पण 1-2 दिवसांपूर्वी Rang De च्या एका नोकरी संदर्भातील post मुळे त्यांची website परत पाहीली. माहिती सविस्तर वाचली. आणि Rang De सोबत आपली संस्था काम करू शकेल व त्यामार्फत काही गरजू लोकांना कर्ज रूपात आर्थिक सहाय्य करू शकेल असे लक्षात आले. म्हणून मग यासंदर्भातील expression of internet चा form देखील भरला. त्यांचा काय. reply येतो ते बघुया पण ही माहिती इतरांना, आपल्या सारखेच काम करत असलेल्या इतर संस्थांना, कार्यकर्त्यांना, इतरांना मदत करावी असे वाटत असलेल्यांना व ज्यांना या कर्जाची गरज आहे त्यांना, होउ शकेल असे वाटले म्हणून हे लिहीत आहे.

peer to peer lending and social investing platform म्हणजे काय? माझ्या मते हा असा एक platform आहे ज्याच्या मार्फत छोट्या कर्जाची गरज असलेल्या पण bank, MFI कडून कर्ज मिळण्यात अडचण असलेल्या लोकांना त्यांना हवे असलेले कर्ज समाजातील अनेक छोटे investors एकत्र येउन देउ शकतील असा platform.

हे लवकर लक्षात येणार नाही पण आपण म्हणूया की कोणा एका व्यक्तीला, उदा. आमच्या कडे काम करत होत्या त्या यमुना मावशींना त्यांचे स्वतःचे घर व्हावे म्हणून 1 लाख ₹ कमी पडत आहे. त्यांना हे पैसे बचत गट, MFI, bank येथून मिळत नाही आहे. मग त्यांना हवे असलेल्या कर्जाबद्दल आमची संस्था Rang De ला माहिती देईल. ते त्यांच्या माफक norms नुसार त्याची तपासणी करतील व त्यांच्या platform वर ही माहिती publish करतील. नंतर भारतभरातील या platform वर नोंदणी केलेली मंडळी ही माहिती पाहू शकतील व त्यांना योग्य वाटेल तेवढी रक्कम या कर्जासाठी देउ शकतील (गुंतवतील). Rang De ही रक्कम aggregate करून यमुना मावशींना देईल. त्या ठरल्याप्रमाणे सुलभ हप्त्यात (EMI द्वारे), कमी व्याजदरात, ही रक्कम Rang De ला परत करतील. व Rang De ज्या सर्वांनी या कर्जासाठी पैसे दिले आहेत त्यांना ठरलेल्या व्याजदराने पैसे दरमहा परत करेल.

आहे सोप? आणि चांगल? कदाचीत तस वाटल नसेल, पण आहे हे सोप आणि चांगल.

अधिक माहिती तुम्ही Rang De यांच्या website वर पाहू शकता. किंवा आवश्यकता भासल्यास आमच्याशीही संपर्क साधू शकता.

]]>
https://swachha.net/2022/01/23/useful-resources-for-ngos-rang-de-peer-to-peer-lending-and-social-investing-platform/feed/ 0 94