Swachha Bahuuddeshiya Sanstha https://swachha.net Swachha Bahuuddeshiya Sanstha Thu, 07 Mar 2024 17:00:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5 214862343 जागतिक महिला दिना निमीत्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आयोजीत केलेल्या “सन्मान ती चा” या कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाचा / माझा सन्मान https://swachha.net/2024/03/07/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%8d/ https://swachha.net/2024/03/07/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%8d/#respond Thu, 07 Mar 2024 17:00:11 +0000 https://swachha.net/?p=311 काल जागतिक महिला दिना निमीत्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आयोजीत केलेल्या “सन्मान ती चा” या कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाचा / माझा सन्मान करण्यात आला. खुप आनंद झाला.

कार्यक्रमात क्षीप्रा मानकर ताई, प्रियदर्शिनी हिंगे ताई, रविंद्र आंबेकर दादा (Ravindra Ambekar), डॉ. रागिणी पारेख ताई, रूपाली चाकणकर ताई, आणि इतर सन्मारार्थी या सगळ्या मान्यवरांना भेटून छान वाटल. मजा आली.

आणि नेहमीसारखच सारिका (Sarika Gaikwad) आणि मिलींद सरनोबत काका सोबत असल्यामुळे मुंबईतील प्रवास अगदीच छान झाला. Thank you. 🙂

]]>
https://swachha.net/2024/03/07/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%8d/feed/ 0 311
शिलाबाई – आस्था प्रकल्पाच्या एक लाभार्थी https://swachha.net/2024/01/27/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88/ https://swachha.net/2024/01/27/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88/#respond Sat, 27 Jan 2024 16:28:13 +0000 https://swachha.net/?p=295

सध्या आपल्या आस्था प्रकल्पामध्ये राहत असलेल्या दोघींपैकी एक म्हणजे शीलाबाई. दोघी म्हाताऱ्या आहेत, थकलेल्या आहेत पण शिलाबाई थोड्या जास्तच. त्या त्यांच्या गावाला एकट्या रहात होत्या. मुल, मुली आहेत. पण तरीही एकट्याच रहात होत्या. या पावसाळ्यात त्यांची झोपडी पडली, सामानही खराब झाल, हरवल. आणि म्हणून मग उघड्यावर. त्यांच्या गावातल्या, ओळखीच्या कमलाबाई आपल्या आश्रमात रहात होत्या म्हणून मग या ही इथे रहायला आल्या. सुरवातीला आणि कधी कधी अजूनही त्या नातेवाईकांना भेटायला जातात पण मग परतही येतात. पण आता इथे रूळल्या आहेत, जमेल ते काम करत आहेत, आणि इथे आनंदाने रहात आहेत. 

काही दिवसांपूर्वी मी त्यांना एक नवीन लुगड दिल, त्यांना खुप आवडल, त्यांनी ते घातल, सगळ्यांना दाखवल आणि अगदी विचारलही की कशी दिसते आहे. त्या दिवशी त्या जाम खुश होत्या. आनंद अगदी चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. आणि त्यांना अस आनंदात पाहून मलाही आनंद होत होता, होत आहे आणि समाधानही.

]]>
https://swachha.net/2024/01/27/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88/feed/ 0 295
आमच्या आयुष्याच्या highlights – 2017-2020 https://swachha.net/2023/11/11/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-highlights-2017-2020/ https://swachha.net/2023/11/11/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-highlights-2017-2020/#respond Sat, 11 Nov 2023 04:35:34 +0000 https://swachha.net/?p=286

कोवीड चा lockdown सुरू होता तेव्हा सहजच मनात विचार आला होता की माझ्या, किंवा आमच्या, आयुष्याच्या highlights (किंवा photo album किंवा मनातील व्यक्त केलेले काही विचार किंवा ते जे काही असेल ते) पुस्तक रूपात प्रसिध्द करूया. तेव्हा वेळही होता आणि म्हणून मग ते त्या पध्दतीने मांडलेही गेले. पण नंतर मात्र हा विचार मागे पडला, तितकासा वेळही मिळाला नाही, आणि नंतर कधीतरी यापेक्षा चांगल्या पध्दतीने मांडणी करूया असा विचार करत करत हे राहून गेले. जवळपास ३.५ वर्षे हे करायचे राहून गेले…

पण आता मात्र ते amazon वर ebook स्वरूपात ते publish केले आहे. पण ते व्यवस्थित झाले आहे का, त्यात काही चूका तर राहील्या नाहीत ना, वैगरे वर मात्र फारसा विचार आम्ही आता केलेला नाही. चुका असतील तर असतील, लक्षात येतील तेव्हा त्या दुरूस्त करू, पण सध्या मात्र राहून गेलेली ही एक गोष्ट / राहून गेलेले हे एक काम पुर्ण करू असे आम्ही ठरवले होते व ते झाले याचे आम्हाला समाधान आहे.

जमल्यास वाचाल. काही टीका टिप्पणी करावी असे वाटल्यास ती जरूर कराल व काही चुका दिसल्यास त्याही लक्षात आणून द्याल जेणे करून त्या दुरूस्त करता येतील. आणि यामध्ये आम्ही खुप सारे photo वापरले आहेत, शक्यतो ते सर्वच आम्हीच काढलेले आहेत आणि आम्ही ज्यांना आमचे जवळचे समजतो त्यांचेचे ते आहेत. पण ते photo वापरण्यासंदर्भात त्यांची रीतसर परवानगी मात्र आम्ही घेतलेली नाही त्यामुळे त्यांच्यापैकी किंवा इतर कुणाला या संदर्भात काही अडचण असल्यास तसे आम्हाला कळवाल जेणे करून आम्ही त्याची योग्य ती दखल घेउन यामध्ये आवश्यक ते बदल करू.

बाकी सगळे छान. जमल्यास वाचाल. कसे वाटले ते कळवाल. शुभ दीपावली.

]]>
https://swachha.net/2023/11/11/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-highlights-2017-2020/feed/ 0 286
प्राजक्ता – आस्था प्रकल्पाची एक लाभार्थी https://swachha.net/2023/09/21/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa/ https://swachha.net/2023/09/21/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa/#respond Thu, 21 Sep 2023 18:11:28 +0000 https://swachha.net/?p=281 काही दिवसांपूर्वी आपल्या आस्था प्रकल्पात प्राजक्ता नावाची 23 वर्षांची एक मुलगी, तिच्या 18 महिन्यांच्या बाळाला सोबत घेउन, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, रहायला आली होती. हे तसे नवीन नाही. याआधिही अशा मुली / महीला आपल्याकडे आल्या होत्याच. पण प्राजक्ताच्या सासरची परिस्थिती थोडी वेगळी होती कारण प्राजक्ता आपल्याकडे आल्यानंतर लगेचच, अगदी 1-2 तासातच ती मंडळी, तिच्या माहेरच्या 2 जणांना सोबत घेउन, तिला व तिच्या बाळाला परत न्यायला आपल्या प्रकल्पात पोहचली पण होती. प्राजक्ता याआधिही अश्या प्रकारे माहेरी गेली होती पण नाईलाजाने परत सासरीही गेली होती. आणि यावेळेसही त्यांचा तसाच प्रयत्न दिसत होता. त्यांनी आम्हालाही सांगायचा प्रयत्न केला की हिचे मानसिक संतुलन ठीक नाही, ती तिच्या मुलाला सांभाळू शकत नाही, इ. आणि नंतर मग म्हणायला लागले की तीला रहायचे आहे तर राहू द्या पण बाळाला मात्र आम्ही घेउन जातो. आणि हे सर्व बोलणे सुरू असतांना प्राजक्ता काहीच बोलत नव्हती, ती फक्त रडत होती. पण ते बाळाला घेउन जातो असे म्हणायला व तसे ते प्रत्यक्ष करतील असे वाटल्यानंतर मात्र आम्ही त्यांना सांगीतले की थांबा, तिचे काय म्हणणे आहे ते ही एकून घ्या. आणि मग थोड्या वेळाने प्राजक्ता अगदी हळू आवाजात नाही म्हणाली. तीने त्यांच्या सोबत जायला नकार दिला आणि बाळालाही त्यांच्या सोबत नेउ देण्यास नकार दिला. तिने हळू आवाजात, रडत रडत, पण स्पष्टपणे नकार दिला. आणि मग मात्र त्यांचा सुर बदलला व ते आम्ही बाळाला कायदेशीर रित्या घेउन जाउ, इ. म्हणायला लागले. पण मग नंतर थोड्या वेळाने ते सर्व परतही गेले. आणि प्राजक्ता आपल्या इथे तिच्या बाळासोबत रहायला लागली. नंतर काही वेळाने तिच्या माहेरची जी मंडळी सोबत आली होती त्यांचा मला phone आला व त्यांनी सांगीतले की प्राजक्ता चांगली मुलगी आहे तिने खुप त्रास सहन केला आहे पण आम्हाला त्यांच्यासमोर तसे बोलता येत नव्हते, इ. आणि तुम्ही जे केले ते खुप चांगले केले. नंतर प्राजक्ता 4-5 दिवस आपल्याकडे राहीली, या दरम्यान ती तिच्या आई वडीलांशीही बोलली, त्यांनीही तिचे म्हणणे एकून घेतले आता परत सासरी जाउ नको, आमच्याकडे ये, आम्ही तुझ्या सोबत आहोत असे सांगीतले व आपण पुढील आवश्यक ती प्रक्रीयाही करू असेही सांगीतले व त्यानुसार प्राजक्ता तिच्या माहेरी परत गेली. सध्या ती त्यांच्यासोबत आहे. आनंदात आहे. पुढे काय करायचे याचा विचार व त्याची तयारी करत आहे.

पण मी मघाशी म्हणाली त्याप्रमाणे यात नवीन अस काही नाही. हे बहुतेक तरी खुप मुलींच्या बाबतीत घडत. काही त्रास सहन करतात, करत राहतात तर काही जणी हिंमत करून या त्रासातून मुक्त होतात. पण तरीही प्रश्न राहतोच की जे झाले ते चांगले झाले का, ते व्हायलाच पाहीजे होते का. माहीत नाही. याच सगळ्यांना लागू पडेल, सगळ्यांसाठी आणि सगळ्या परिस्थितीत बरोबर असेल अस काही उत्तर नाही आहे बहुतेक. कारण प्रत्येक छोट्या मोठ्या मतभेदासाठी एकदम टोकाची भुमीका घेण जस चुकीच आहे तसच हे तर सगळ्यांच्याच बाबतीत होत त्यात नवीन काय आहे अस म्हणून होत असलेल्या प्रत्येक अन्यायाकडे / त्रासाकडे दुर्लक्ष करण, तो सहन करण, तो सहन करायला लावण हे ही सगळ चुकीचच आहे अस मला / आम्हाला वाटत. पण याबाबतीत ज्याचा त्याच्या निर्णय त्या त्या व्यक्तीने स्वतःच घ्यायचा असतो, योग्य काय अयोग्य काय हे ही त्या व्यक्तीने स्वतःच ठरवायच असत असही मला / आम्हाला वाटत. आणि अशी वेळ कोणावरही येउ नये असही मला / आम्हाला वाटत..

पण असो. बाकी सगळे छान. गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा.

]]>
https://swachha.net/2023/09/21/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa/feed/ 0 281
आस्था भोजनालयातील (Irwin Hospital मधील Canteen मधील) customer / beneficiary चा positive feedback https://swachha.net/2023/09/10/%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-irwin-hospital-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-c/ https://swachha.net/2023/09/10/%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-irwin-hospital-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-c/#respond Sun, 10 Sep 2023 14:14:27 +0000 https://swachha.net/?p=273 आपल्या आस्था भोजनालयातील (Irwin Hospital मधील Canteen मधील) एका customer / beneficiary (शिवानी ठाकरे) चा कालचा positive feedback. आणि आजही अमीत दादांनी यवतमाळच्या श्री. सुरेश राठी आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठीचे जेवण आस्था भोजनालयातूनच मागवले होते. ते देखील सगळ्यांना आवडले. छान वाटले. आणि या निमीत्ताने त्यांच्याशी आपल्या आस्था प्रकल्पाबद्दल सविस्तर बोलणेही झाले. Thank you Amit Arokar दादा, शिवानी.

]]>
https://swachha.net/2023/09/10/%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-irwin-hospital-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-c/feed/ 0 273
10000 meals and counting https://swachha.net/2023/08/21/10000-meals-and-counting/ https://swachha.net/2023/08/21/10000-meals-and-counting/#respond Mon, 21 Aug 2023 09:32:36 +0000 https://swachha.net/?p=262 आपला जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती (Irwin Hospital, Amravati) येथील अन्नदानाचा उपक्रम आज 10000 मोफत जेवण वाटपाचा टप्पा गाठत आहे. उपक्रमात सहभागी असलेल्या सगळ्यांचे आभारी आहोत.

Arti Amte – Nankar, Shital Bhatkar, With Arya Foundation.

]]>
https://swachha.net/2023/08/21/10000-meals-and-counting/feed/ 0 262
डॉ. अविनाश सावजी यांनी आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली https://swachha.net/2023/08/14/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b/ https://swachha.net/2023/08/14/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b/#respond Mon, 14 Aug 2023 17:34:28 +0000 https://swachha.net/?p=254 आज सावजी काकांनी (Dr. Avinash Saoji) आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात आलेल्या शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली. यानिमीत्ताने मी करत असलेल्या कामाबद्दल (आस्था प्रकल्पाबद्दल, आस्था भोजनालयाबद्दल, आमच्या इतर प्रकल्पांबद्दल) सगळ्यांना माहिती देता आली, याबद्दल त्यांनी बरेच प्रश्नही विचारले, त्यावरही चांंगली चर्चा झाली. माझ्या आयुष्यातल्या इतरही अनेक गोष्टींवरही बोलणे झाले. आणि मी न गडबडता चांगली बोलली अस माझ मलाच वाटल, आणि तस सावजी काकांनीही नंतर मला सांगीतल (आणि उदय भेटेल तेव्हा त्यालाही मी तस सांगेल अस ते म्हणाले), त्यामुळे मला छान वाटल. कार्यक्रम मस्त झाला, सगळ्यांना आवडला, मलाही.
Thank you राजश्री, सावजी काका.

]]>
https://swachha.net/2023/08/14/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b/feed/ 0 254
Audit and Progress Report for FY 2022-23 https://swachha.net/2023/07/17/our-audit-and-progress-report-for-fy-2022-23/ https://swachha.net/2023/07/17/our-audit-and-progress-report-for-fy-2022-23/#respond Mon, 17 Jul 2023 07:50:21 +0000 https://swachha.net/?p=242 We are excited to announce the publication of Swachha Bahuuddeshiya Sanstha’s annual progress report and audit reports. These reports provide an overview of our achievements, challenges, and financial performance over the past year. We are committed to transparency and accountability, and we invite you to review these reports to learn more about our work and impact. Thank you for your continued support of Swachha Bahuuddeshiya Sanstha.

]]>
https://swachha.net/2023/07/17/our-audit-and-progress-report-for-fy-2022-23/feed/ 0 242
आस्था प्रकल्पातील रहिवासी आणि आम्ही. https://swachha.net/2023/06/08/%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8/ https://swachha.net/2023/06/08/%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8/#respond Thu, 08 Jun 2023 04:07:14 +0000 https://swachha.net/?p=238 आम्ही आस्था प्रकल्प सुरू केला तेव्हा त्यात काय काय अडचणी येतील याबद्दल बराच विचार केला होता आणि त्या वेळेस वाटत होत्या त्या जवळपास सगळ्याच अडचणी आल्याही. पण त्या अपेक्षित होत्या, त्यामुळे त्यांच्या बद्दल काही ना काही उपाय योजना देखील मनात होती आणि जरी मनात होत तस सगळं झाल नाही तरी त्याचा फार काही त्रास झाला नाही. पण त्या वेळेस एक गोष्ट मात्र लक्षात आली नव्हती किंवा त्याचा किती त्रास होऊ शकतो याचा विचार आम्ही केला नव्हता आणि ती गोष्ट म्हणजे – आपल्याकडे कायम नवीन नवीन माणसं येत राहतील आणि अर्थातच ते कधी तरी परत / आपल्या पासून दूर ही जातील आणि या सगळ्यामुळेही आपल्याला वाईट वाटेल, त्रास होईल…

आम्हाला हे आता प्रकर्षाने जाणवत आहे कारण मागील काही महिन्यात आमच्या प्रकल्पात राहणारी, भोजनालयात काम करणारी बरीच माणसं बदलली. अगदी आपल्याकडे माणसं फार दिवस टिकत नाहीत असा विचार मनात यावा एवढी. त्यामुळे आपण काही चुकीच तर करत नाही आहोत ना, चुकीच वागत तर नाही आहोत ना, असे अनेक प्रश्न मनात येत होते. त्याबद्दल आमचे बोलणेही होत होते, विचार सुरू होता पण नक्की कारण समजत नव्हते आणि मग अचानक लक्षात आले की हे तर होणारच आहे. कारण एखाद्या घरात जेव्हा नवीन व्यक्ती येते किंवा जाते त्या प्रत्येक वेळेस त्या घरातील इतर व्यक्तींच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होतच असतो आणि बऱ्याचदा तो बदल / तो परिणाम त्यांना आवडत नसतो. म्हणजे एखाद्या घरात नवीन मुल जन्माला आल्यानंतर त्या मुलाच्या मोठ्या भावंडांना आता आपले आई वडील आपल्याकडे कमी लक्ष देतात असे वाटायला लागते, त्यांना आपली खेळणी व आपले सामान त्या नवीन बाळा सोबत वाटावे लागते, त्याला आपल्या खेळात सामावुन घ्यावे लागते, सांभाळून घ्यावे लागते आणि हे सगळं त्या मोठ्या भावंडांना शक्यतो आवडत नाही हे त्याप्रमाणे आहे बहुतेक. किंवा मग लग्न झाल्यानंतर मुलगा आपल्याकडे कमी लक्ष देतो असे जवळपास प्रत्येक आईला वाटायला लागते हे त्याप्रमाणे आहे बहुतेक. म्हणजे आमच्या प्रकल्पात जेव्हा जेव्हा नवीन व्यक्ती रहायला आली किंवा प्रकल्प सोडून गेली तेव्हा तेव्हा प्रकल्पात राहत असलेल्या इतरांवर, भोजनालयात काम करत असलेल्या इतरांवरही, त्याचा परिणाम झालाच – कधी त्यांना त्यांची खोली share करावी लागली, कधी कधी बदलावीही लागली, त्यांना त्यांच्या सवयींमध्ये बदल करावे लागले, त्यांच्या कामामध्ये व कामाच्या वेळांमध्ये बदल करावे लागले आणि हे बदल बहुतेक तरी त्यांना आवडले नाहीत, मानवले नाहीत. पण ही झाली एक बाजू.

आणि दुसरी बाजू म्हणजे हे सर्व बदल आणि त्याचा परिणाम आमच्याही आयुष्यावर होत होताच. आणि खरतर इतरांपेक्षा जरा जास्तीच. कदाचित आमचा प्रकल्प छोटा असल्यामुळे असेल हे असे, किंवा स्वभावामुळे असेल हे असे, पण आमच्या प्रकल्पातील प्रत्येक व्यक्ती सोबत आमची / माझी खुप attachment होती / आहे. ते देखील आमच्या कुटुंबाचाच भाग होते / आहेत. आणि जसे आपल्याला आपल्या घरातील मुलांना / इतरांना कधी कधी ओरडावे लागते, कधी समजवावे लागते, कधी शिक्षा करावी लागते, कधी सांभाळून घ्यावे लागते, कधी कधी दुर्लक्ष करावे लागते अगदी तसेच आम्हाला या सर्वांच्या बाबतीत करावे लागते. पण थोड्या जास्ती वेळेस. आणि या सोबतच, आणि त्यामुळेच, जेव्हा जेव्हा कोणी कुठल्याही कारणामुळे प्रकल्प, किंवा आमचे भोजनालय, सोडून जातो त्या जवळपास प्रत्येक वेळेस मला / आम्हाला खुप प्रश्न पडतात, खुप त्रास होतो, खुप वाईट वाटत. आणि हे वारंवार झाल आहे. होत आहे. होणार आहे.

आणि या गोष्टीचा विचार आम्ही आधी केला नव्हता. आणि आता तो केला तरीही त्यावर काही उपाय योजना सुचेल असे आता वाटत नाही. पण तरीही माझी / आमची हौस अजून फिटलेली नाही आणि त्यामुळे परत एकदा या सगळ्याला सामोरे जायला मी / आम्ही तयार आहोत. बघूया पुढे काय होते ते.

अर्चनाची मुलगी अदिती आणि मी (आरती आमटे – नानकर)
]]>
https://swachha.net/2023/06/08/%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8/feed/ 0 238
Max Woman Conclave at Mumbai https://swachha.net/2023/05/07/max-woman-conclave-at-mumbai/ https://swachha.net/2023/05/07/max-woman-conclave-at-mumbai/#respond Sun, 07 May 2023 04:25:42 +0000 https://swachha.net/?p=226 Max Maharashtra, Max Woman च्या Max Woman Conclave च्या निमीत्ताने मी दोन दिवस मुंबईला गेली होती. तिथे कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाबद्दल, काम करत असतांना आलेल्या अडचणींबद्दल, पुढे जे करायचे आहे त्याबद्दल, आणि स्वतःबद्दल बोलायला मिळाले. कार्यक्रमाआधी व बोलायला सुरवात केली तेव्हा मनात थोडी धाकधूक होती, पण नंतर बोलायला लागल्यानंतर मात्र चांगले बोलली बहुतेक. 🙂

कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या (Max Maharashtra ची Team, रूपाली ठोंबरे, अतीका फारूखी, सुलभा कोरे, राही भिडे, प्रदीप कुलकर्णी, विजया पवार, मनोज दादा, प्रियदर्शनी हिंगे, इ. च्या) भेटी झाल्या, बोलणे झाले, छान वाटले. अतीका फारूखी व रूपाली ठोंबरे यांच्याशीही छान गप्पा झाल्या, त्यांनी कामाबद्दल बरेच प्रश्न विचारले, समजून घेतले, आणि त्यांच्याशी चांगली मैत्री झाली.

मुंबईला आयडा सोबत आली म्हणून खुप बरे झाले. आणि या निमीत्ताने माझ्या मैत्रिणीची संजिवनीची खुप वर्षांनंतर (बहुतेक 20 वर्षानी) भेट झाली. पण इतक्या दिवसांनी भेटत आहोत असे मुळीच वाटले नाही. आणि तिच्यासोबतच सारीका व शिवा हेही पुर्ण दिवस सोबत होते. त्यामुळे मुंबईतील प्रवास सोपा झाला, चांगला झाला आणि खुप मजा आली. thank you संजिवनी, सारीका, शिवा, आयडा.

आणि कार्यक्रमाला बोलावले, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल रवींद्र आंबेकर (Ravindra Ambekar), रवी चव्हाण यांचे विशेष आभार.

]]>
https://swachha.net/2023/05/07/max-woman-conclave-at-mumbai/feed/ 0 226