जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दररोज संध्याकाळी 50 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण (दोन घास) देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ

परवापासून आम्ही विथ आर्या (Withaarya) या संस्थेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दररोज संध्याकाळी 50 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण (दोन घास) देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आणि याचा गरजू लोकांना चांगला उपयोग होत आहे, व होईल अशी आम्हाला आशा आहे.

परवाचा बेत – मसाले भात, आलू वाटाण्याची भाजी, पोळी, सलाद.
शुभारंभाच्या कार्यक्रमाला माझी मैत्रिण डॉ. सौ. मिनाक्षी व्यवहारे, व तिचे पती व अमरावतीचे SDO डॉ. श्री. नितीन व्यवहारे, आणि आई – अण्णा (सेवानिवृत्त प्राचार्य श्री. मधुकर नानकर व सौ. सुमन नानकर) हे उपस्थित होते.
शुभारंभाच्या कार्यक्रमाला इतर मान्यवर – श्री. प्रविण गुल्हाने, सुप्रिया गजभिये, श्री. बागडे, इ., व संस्थेचे कार्यकर्ते, व काही पत्रकार हे देखील उपस्थित होते.
वाटपासाठी बनवलेले 50 parcels अवघ्या काही मिनीटात संपले. नंतर काही लोकांनी खास परत येउन जेवण आवडले असेही सांगीतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top