आमच्या आयुष्याच्या highlights – 2017-2020

कोवीड चा lockdown सुरू होता तेव्हा सहजच मनात विचार आला होता की माझ्या, किंवा आमच्या, आयुष्याच्या highlights (किंवा photo album किंवा मनातील व्यक्त केलेले काही विचार किंवा ते जे काही असेल ते) पुस्तक रूपात प्रसिध्द करूया. तेव्हा वेळही होता आणि म्हणून मग ते त्या पध्दतीने मांडलेही गेले. पण नंतर मात्र हा विचार मागे पडला, तितकासा वेळही मिळाला नाही, आणि नंतर कधीतरी यापेक्षा चांगल्या पध्दतीने मांडणी करूया असा विचार करत करत हे राहून गेले. जवळपास ३.५ वर्षे हे करायचे राहून गेले…

पण आता मात्र ते amazon वर ebook स्वरूपात ते publish केले आहे. पण ते व्यवस्थित झाले आहे का, त्यात काही चूका तर राहील्या नाहीत ना, वैगरे वर मात्र फारसा विचार आम्ही आता केलेला नाही. चुका असतील तर असतील, लक्षात येतील तेव्हा त्या दुरूस्त करू, पण सध्या मात्र राहून गेलेली ही एक गोष्ट / राहून गेलेले हे एक काम पुर्ण करू असे आम्ही ठरवले होते व ते झाले याचे आम्हाला समाधान आहे.

जमल्यास वाचाल. काही टीका टिप्पणी करावी असे वाटल्यास ती जरूर कराल व काही चुका दिसल्यास त्याही लक्षात आणून द्याल जेणे करून त्या दुरूस्त करता येतील. आणि यामध्ये आम्ही खुप सारे photo वापरले आहेत, शक्यतो ते सर्वच आम्हीच काढलेले आहेत आणि आम्ही ज्यांना आमचे जवळचे समजतो त्यांचेचे ते आहेत. पण ते photo वापरण्यासंदर्भात त्यांची रीतसर परवानगी मात्र आम्ही घेतलेली नाही त्यामुळे त्यांच्यापैकी किंवा इतर कुणाला या संदर्भात काही अडचण असल्यास तसे आम्हाला कळवाल जेणे करून आम्ही त्याची योग्य ती दखल घेउन यामध्ये आवश्यक ते बदल करू.

बाकी सगळे छान. जमल्यास वाचाल. कसे वाटले ते कळवाल. शुभ दीपावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *