Tag: Aastha Bhojanalaya

  • आस्था प्रकल्पातील नवीन निवासी – अर्चना

    आई बाबा डॉक्टर असल्यामुळे माझा लहानपणापासूनच दवाखाना, डॉक्टर्स यांच्याशी खुप संपर्क आला आहे, मी स्वतः nurse म्हणून काही वर्ष कामही केले आहे, पण तरीही, योगायोगानेच म्हणूया पण, एखाद्या patient च्या सोबत दवाखान्यामध्ये जाण्याचा, डॉक्टरांची वाट पाहण्याचा, patient सोबत दवाखान्यात तासन तास बसून राहण्याचा मात्र मला फारसा अनुभव नव्हता. आता तोही अनुभव आला, आणि तो अनुभव अर्थातच काही फारसा चांगला नव्हता.

    3-4 दिवसांपूर्वी आपल्या आस्था प्रकल्पात अर्चना नावाची 1 सत्तावीस वर्षांची मुलगी, तिच्या 3 वर्षांच्या लहान मुलीसह राहण्यास आली. ती pregnant ही आहे आणि आता तिला दुसरे बाळ नको आहे. ती येथे आली तेव्हा तिची तब्येत खुपच नाजूक होती. आणि म्हणून मग तिला सोबत घेउन मी सरकारी दवाखान्यात गेली. तिथे तिला तपासणी केल्यानंतर भरती करून घेण्यात आले, व काल दोन दिवसांनंतर तिला थोडे बरे वाटल्यावर घरी सोडण्यात आले. पण abortion मात्र 1 महिन्यानंतर करू असे डॉक्टरांनी सांगीतले आहे.

    पण आता तीला थोडे बरे वाटत आहे. आणि मलाही (कारण दवाखान्यातल्या त्या वातावरणामुळे मलाही खुपच अस्वस्थ वाटत होते).

  • आस्था भोजनालय सुरू करून 1 वर्ष झालेही!

    आपले आस्था भोजनालय सुरू करून या 28 तारखेला 1 वर्ष होत आहे. आणि आपल्या आस्था या निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पालाही सुरू होउन जवळपास 1.5 वर्ष होत आहेत. त्यामुळे या दोघांबद्दल काही updates.

    आस्था निवासी प्रकल्पाचा फायदा आतापर्यंत एकूण 10 लोकांना (8 पुरूष व 2 महिला यांना) झाला आहे, होत आहे. व सध्या आपल्या प्रकल्पात 7 लोक (6 पुरूष व 1 महिला) राहत आहेत. प्रकल्पातील वातावरण आनंदी आहे. सगळ्यांच्याच तब्येती ठीक आहेत. आणि प्रकल्पात राहण्यासाठी अत्यावश्यक अश्या जवळपास सर्व सोयी सुविधा झाल्या आहेत. काही गोष्टींची अजून आवश्यकता आहेच, प्रकल्पासाठी स्वतःची जागा देखील बाकी आहे, पण त्या गोष्टी तितक्याश्या urgent नाही.

    आस्था भोजनालयाने या वर्षभरात प्रकल्पातील रहिवाशी, कार्यकर्ते, पाहूणे, customers, इ. सर्वांचे मिळून जवळपास 11000 meals (जेवणाची ताट) serve केली आहेत. व येथील जेवण जवळपास या सर्वांनाच आवडले आहे. आस्था भोजनालयाने लहान मोठ्या कार्यक्रमांंच्या एकूण 24 catering च्या orders पुर्ण केल्या आहेत (त्यापैकी 1 order वगळता, इतर सर्व customers आपल्या येथील जेवणाने, service ने खुश झाले आहेत). आस्था भोजनालयाने आजपर्यंत एकूण 316015 ₹ चे उत्पन्न मिळवले आहे (पण हा फक्त revenue आहे, फायदा नक्कीच नाही कारण सध्या तरी खर्च यापेक्षा बराच जास्त आहे). आणि आपल्या प्रकल्पातील जवळपास सगळ्यांनाच ते करू शकतील असे काम, व सन्मानाने आणि आनंदाने जगता येण्याची संधी, आस्था भोजनालयाने पुरवली आहे.

    खरतर आस्था प्रकल्पाशी व आस्था भोजनालयाशी संबंधीत हे सर्वच आकडे खुपच छोटे आहेत. पण गेल्या वर्षभरातील परिस्थिती, उपलब्ध resources, इतर जवाबदाऱ्या या सगळ्यांचा विचार करता मी, आम्ही सर्वच, या आकड्यांनी व प्रकल्प आणि भोजनालय गेल्या 1 वर्षापासून सातत्याने सुरू आहे म्हणून खुश आहोत, समाधानी आहोत व येणाऱ्या वर्षाबद्दल आशावादी आहोत. आणि आपल्या या प्रकल्पाला, भोजनालयाला, आम्हाला मदत व मार्गदर्शन करणाऱ्या, करत असलेल्या सर्वांचे, ज्यांचे आमच्याकडे photo नाहीत, add करायचे राहून गेले त्या सर्वांचेही, मनापासून आभारी आहोत.

    our supporters
    our supporters
    our supporters
  • Registration – MCA registration for undertaking CSR activities

    Recently, on 4 January 2022, we have received approval from MCA for undertaking CSR activities and the registration number given by MCA for the same is CSR00020002.

    Approval letter from MCA for undertaking CSR activities

    Now various companies which are mandated to spend money under CSR act can support various activities of Swachha Bahuuddeshiya Sanstha and our Aastha – Home for the Needy and the Destitute.

  • आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती

    मी आत्ता हे लिहण्यापूर्वी आपल्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाबद्दल याआधी केव्हा व काय लिहिले होत ते पहात होते तेव्हा मला लक्षात आल की या प्रकल्पाबद्दल मी जवळपास 5 महिन्यांच्या नंतर काहीतरी लिहित आहे. खुप आश्चर्य वाटलं, आणि थोडं वाईटही. आश्चर्य यासाठी वाटलं की जरी इतक्या दिवसात या प्रकल्पाबद्दल मी काही लिहल नाही तरी, मधल्या काही दिवसांचा अपवाद सोडल्यास, जवळपास रोजच माझे कोणा ना कोणाशी या प्रकल्पाबद्दल काही ना काही बोलणं होतच आहे. आणि वाईट यासाठी वाटलं की आपलं हे काम देखील फारच हळू हळू सुरू आहे हे आज परत एकदा प्रकर्षाने जाणवलं, आणि ठरवून देखील प्रकल्पाबद्दलचे नियमित updates देऊ शकलो नाहीत म्हणूनही.

    पण तरीही आनंद याचा आहेच की काम, हळू हळू का असेना पण, सुरू आहे.

    तर प्रकल्पाबद्दलचे काही updates –

    • आम्ही प्रकल्पाचे नाव ठेवले. नावाबद्दल बरीच चर्चा झाली, बरीच नाव सुचवली गेली, सगळीच छान होती पण त्यापैकी हे नाव ठेवले (आणि हे नाव अनु दादाने सुचवलेले आहे). प्रकल्पाचे नाव: आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प.
    • प्रकल्पासाठी भाड्याने घेतलेल्या नवीन जागेत आम्ही रहायला आलो. तेथे काही अत्यावश्यक सोयी – सुविधा केल्या, पण अजून बऱ्याच शिल्लक आहेतच.
    • सध्या प्रकल्पात 3 व्यक्ती आहेत (व त्यांची थोडक्यात माहिती https://www.swachha.net/aastha-home-for-destitute येथे पाहता येईल).
    • प्रकल्पाचा भाग म्हणून सुरू करायची होती ती खानावळ देखील सुरू झाली (28 जानेवारी 2021 ला, पण उद्घाटनाचा कार्यक्रम मात्र अजून बाकी आहे). खानावळीचे नाव: आस्था भोजनालय (भोजनालयाचा पत्ता आणि इतर माहिती https://maps.app.goo.gl/vffrGLvN6rgc6XuJ9 येथे व Aastha Bhojanalaya येथे पाहता येईल, आणि ही खानावळ असली तरीही इथले जेवण मात्र छान आहे, त्यामुळे जेवणासाठी नक्की याल, order कराल).
    • प्रकल्पासाठी मदत निधी म्हणून आम्ही जमा करण्याचा प्रयत्न करत होतो तेवढी रक्कम जमा झाली नाही (पण हळू हळू होईलही). त्यामुळे थोड्या अडचणी येत आहेत. आणि प्रकल्पाचे काढलेले budget व सध्याचा खर्च यात सध्या तरी बरीच तफावतही आहे. पण काम सुरू आहे, आणि अजून काही महिन्यांनंतर व प्रकल्पाच्या लाभार्थ्यांची संख्या 20 झाल्यानंतर budget, expenditure व revenue यातील ही तफावत कमी होईल अशी आम्हाला आशाही आहे.

    आणि या व्यतिरिक्तही बरेच updates आहेतच. बरेच वेगवेगळे अनुभव येत आहेत. कधीकधी अगदी ‘आता काय करायचे?’ किंवा ‘आपण काही चुकीचे तर करत नाही आहोत ना?’ असे प्रश्नही पडतात, कधीकधी खुप काळजीही वाटते. पण या सोबतच खुप साऱ्या चांगल्या गोष्टीही घडत आहेतच. आणि सध्या आम्ही अगदी थकून जात असलो तरीही, आम्हाला वेळ अगदी अपुरा पडत असला तरीही, आम्ही खुप आनंदी आहोत.