आज सावजी काकांनी (Dr. Avinash Saoji) आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात आलेल्या शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली. यानिमीत्ताने मी करत असलेल्या कामाबद्दल (आस्था प्रकल्पाबद्दल, आस्था भोजनालयाबद्दल, आमच्या इतर प्रकल्पांबद्दल) सगळ्यांना माहिती देता आली, याबद्दल त्यांनी बरेच प्रश्नही विचारले, त्यावरही चांंगली चर्चा झाली. माझ्या आयुष्यातल्या इतरही अनेक गोष्टींवरही बोलणे झाले. आणि मी न गडबडता चांगली बोलली अस माझ मलाच वाटल, आणि तस सावजी काकांनीही नंतर मला सांगीतल (आणि उदय भेटेल तेव्हा त्यालाही मी तस सांगेल अस ते म्हणाले), त्यामुळे मला छान वाटल. कार्यक्रम मस्त झाला, सगळ्यांना आवडला, मलाही.
Thank you राजश्री, सावजी काका.
Tag: Arti Amte – Nankar
-
डॉ. अविनाश सावजी यांनी आयोजीत केलेल्या निवासी युवा प्रेरणा शिबीरात शिबीरार्थींशी बोलायची संधी मिळाली
-
Audit and Progress Report for FY 2022-23
We are excited to announce the publication of Swachha Bahuuddeshiya Sanstha’s annual progress report and audit reports. These reports provide an overview of our achievements, challenges, and financial performance over the past year. We are committed to transparency and accountability, and we invite you to review these reports to learn more about our work and impact. Thank you for your continued support of Swachha Bahuuddeshiya Sanstha.
-
आस्था प्रकल्पातील रहिवासी आणि आम्ही.
आम्ही आस्था प्रकल्प सुरू केला तेव्हा त्यात काय काय अडचणी येतील याबद्दल बराच विचार केला होता आणि त्या वेळेस वाटत होत्या त्या जवळपास सगळ्याच अडचणी आल्याही. पण त्या अपेक्षित होत्या, त्यामुळे त्यांच्या बद्दल काही ना काही उपाय योजना देखील मनात होती आणि जरी मनात होत तस सगळं झाल नाही तरी त्याचा फार काही त्रास झाला नाही. पण त्या वेळेस एक गोष्ट मात्र लक्षात आली नव्हती किंवा त्याचा किती त्रास होऊ शकतो याचा विचार आम्ही केला नव्हता आणि ती गोष्ट म्हणजे – आपल्याकडे कायम नवीन नवीन माणसं येत राहतील आणि अर्थातच ते कधी तरी परत / आपल्या पासून दूर ही जातील आणि या सगळ्यामुळेही आपल्याला वाईट वाटेल, त्रास होईल…
आम्हाला हे आता प्रकर्षाने जाणवत आहे कारण मागील काही महिन्यात आमच्या प्रकल्पात राहणारी, भोजनालयात काम करणारी बरीच माणसं बदलली. अगदी आपल्याकडे माणसं फार दिवस टिकत नाहीत असा विचार मनात यावा एवढी. त्यामुळे आपण काही चुकीच तर करत नाही आहोत ना, चुकीच वागत तर नाही आहोत ना, असे अनेक प्रश्न मनात येत होते. त्याबद्दल आमचे बोलणेही होत होते, विचार सुरू होता पण नक्की कारण समजत नव्हते आणि मग अचानक लक्षात आले की हे तर होणारच आहे. कारण एखाद्या घरात जेव्हा नवीन व्यक्ती येते किंवा जाते त्या प्रत्येक वेळेस त्या घरातील इतर व्यक्तींच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होतच असतो आणि बऱ्याचदा तो बदल / तो परिणाम त्यांना आवडत नसतो. म्हणजे एखाद्या घरात नवीन मुल जन्माला आल्यानंतर त्या मुलाच्या मोठ्या भावंडांना आता आपले आई वडील आपल्याकडे कमी लक्ष देतात असे वाटायला लागते, त्यांना आपली खेळणी व आपले सामान त्या नवीन बाळा सोबत वाटावे लागते, त्याला आपल्या खेळात सामावुन घ्यावे लागते, सांभाळून घ्यावे लागते आणि हे सगळं त्या मोठ्या भावंडांना शक्यतो आवडत नाही हे त्याप्रमाणे आहे बहुतेक. किंवा मग लग्न झाल्यानंतर मुलगा आपल्याकडे कमी लक्ष देतो असे जवळपास प्रत्येक आईला वाटायला लागते हे त्याप्रमाणे आहे बहुतेक. म्हणजे आमच्या प्रकल्पात जेव्हा जेव्हा नवीन व्यक्ती रहायला आली किंवा प्रकल्प सोडून गेली तेव्हा तेव्हा प्रकल्पात राहत असलेल्या इतरांवर, भोजनालयात काम करत असलेल्या इतरांवरही, त्याचा परिणाम झालाच – कधी त्यांना त्यांची खोली share करावी लागली, कधी कधी बदलावीही लागली, त्यांना त्यांच्या सवयींमध्ये बदल करावे लागले, त्यांच्या कामामध्ये व कामाच्या वेळांमध्ये बदल करावे लागले आणि हे बदल बहुतेक तरी त्यांना आवडले नाहीत, मानवले नाहीत. पण ही झाली एक बाजू.
आणि दुसरी बाजू म्हणजे हे सर्व बदल आणि त्याचा परिणाम आमच्याही आयुष्यावर होत होताच. आणि खरतर इतरांपेक्षा जरा जास्तीच. कदाचित आमचा प्रकल्प छोटा असल्यामुळे असेल हे असे, किंवा स्वभावामुळे असेल हे असे, पण आमच्या प्रकल्पातील प्रत्येक व्यक्ती सोबत आमची / माझी खुप attachment होती / आहे. ते देखील आमच्या कुटुंबाचाच भाग होते / आहेत. आणि जसे आपल्याला आपल्या घरातील मुलांना / इतरांना कधी कधी ओरडावे लागते, कधी समजवावे लागते, कधी शिक्षा करावी लागते, कधी सांभाळून घ्यावे लागते, कधी कधी दुर्लक्ष करावे लागते अगदी तसेच आम्हाला या सर्वांच्या बाबतीत करावे लागते. पण थोड्या जास्ती वेळेस. आणि या सोबतच, आणि त्यामुळेच, जेव्हा जेव्हा कोणी कुठल्याही कारणामुळे प्रकल्प, किंवा आमचे भोजनालय, सोडून जातो त्या जवळपास प्रत्येक वेळेस मला / आम्हाला खुप प्रश्न पडतात, खुप त्रास होतो, खुप वाईट वाटत. आणि हे वारंवार झाल आहे. होत आहे. होणार आहे.
आणि या गोष्टीचा विचार आम्ही आधी केला नव्हता. आणि आता तो केला तरीही त्यावर काही उपाय योजना सुचेल असे आता वाटत नाही. पण तरीही माझी / आमची हौस अजून फिटलेली नाही आणि त्यामुळे परत एकदा या सगळ्याला सामोरे जायला मी / आम्ही तयार आहोत. बघूया पुढे काय होते ते.

अर्चनाची मुलगी अदिती आणि मी (आरती आमटे – नानकर) -
Max Woman Conclave at Mumbai
Max Maharashtra, Max Woman च्या Max Woman Conclave च्या निमीत्ताने मी दोन दिवस मुंबईला गेली होती. तिथे कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाबद्दल, काम करत असतांना आलेल्या अडचणींबद्दल, पुढे जे करायचे आहे त्याबद्दल, आणि स्वतःबद्दल बोलायला मिळाले. कार्यक्रमाआधी व बोलायला सुरवात केली तेव्हा मनात थोडी धाकधूक होती, पण नंतर बोलायला लागल्यानंतर मात्र चांगले बोलली बहुतेक.

कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या (Max Maharashtra ची Team, रूपाली ठोंबरे, अतीका फारूखी, सुलभा कोरे, राही भिडे, प्रदीप कुलकर्णी, विजया पवार, मनोज दादा, प्रियदर्शनी हिंगे, इ. च्या) भेटी झाल्या, बोलणे झाले, छान वाटले. अतीका फारूखी व रूपाली ठोंबरे यांच्याशीही छान गप्पा झाल्या, त्यांनी कामाबद्दल बरेच प्रश्न विचारले, समजून घेतले, आणि त्यांच्याशी चांगली मैत्री झाली.
मुंबईला आयडा सोबत आली म्हणून खुप बरे झाले. आणि या निमीत्ताने माझ्या मैत्रिणीची संजिवनीची खुप वर्षांनंतर (बहुतेक 20 वर्षानी) भेट झाली. पण इतक्या दिवसांनी भेटत आहोत असे मुळीच वाटले नाही. आणि तिच्यासोबतच सारीका व शिवा हेही पुर्ण दिवस सोबत होते. त्यामुळे मुंबईतील प्रवास सोपा झाला, चांगला झाला आणि खुप मजा आली. thank you संजिवनी, सारीका, शिवा, आयडा.
आणि कार्यक्रमाला बोलावले, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल रवींद्र आंबेकर (Ravindra Ambekar), रवी चव्हाण यांचे विशेष आभार.

कार्यक्रमाआधी व बोलायला सुरवात केली तेव्हा मनात थोडी धाकधूक होती पण नंतर बोलायला लागल्यानंतर मात्र चांगले बोलली बहुतेक. 
कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या (Max Maharashtra ची Team, रूपाली ठोंबरे, अतीका फारूखी, सुलभा कोरे, राही भिडे, प्रदीप कुलकर्णी, विजया पवार, इ. च्या) भेटी झाल्या, बोलणे झाले, छान वाटले. 
संजीवनीच्या घरातून दिसणारी मुंबई. 
कार्यक्रमाला बोलावले, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल रवींद्र आंबेकर यांचे विशेष आभार. 
प्रियदर्शनी हिंगे यांनाही प्रत्यक्ष भेटता आले. 
खुप वर्षांनंतर (बहुतेक 20 वर्षानी) माझ्या मैत्रिणीची संजिवनीची भेट झाली. पण इतक्या दिवसांनी भेटत आहोत असे मुळीच वाटले नाही. खुप छान वाटल. मजा आली. 
सारीका व शिवा हे पुर्ण दिवस सोबत होते त्यामुळे मजा आली. मुंबईतील प्रवास सोपा झाला, आयडाची मालाड येथील चर्चमध्ये जाउन प्रार्थना करायची इच्छाही पुर्ण झाली. आणि कार्यक्रमात मनोज दादाही भेटला. 
अतीका फारूखी यांच्याशीही छान गप्पा झाल्या, त्यांनी कामाबद्दल बरेच प्रश्न विचारले, समजून घेतले, आणि त्यांच्याशी चांगली ओळख झाली. -
“दोन घास” उपक्रमाच्या शुभारंभाची बातमी.
“दोन घास” उपक्रमाच्या शुभारंभाची बातमी. Thank you, Shashank Laware Dada.

-

जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दररोज संध्याकाळी 50 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण (दोन घास) देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ
परवापासून आम्ही विथ आर्या (Withaarya) या संस्थेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दररोज संध्याकाळी 50 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण (दोन घास) देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आणि याचा गरजू लोकांना चांगला उपयोग होत आहे, व होईल अशी आम्हाला आशा आहे.

परवाचा बेत – मसाले भात, आलू वाटाण्याची भाजी, पोळी, सलाद. 
शुभारंभाच्या कार्यक्रमाला माझी मैत्रिण डॉ. सौ. मिनाक्षी व्यवहारे, व तिचे पती व अमरावतीचे SDO डॉ. श्री. नितीन व्यवहारे, आणि आई – अण्णा (सेवानिवृत्त प्राचार्य श्री. मधुकर नानकर व सौ. सुमन नानकर) हे उपस्थित होते. 
शुभारंभाच्या कार्यक्रमाला इतर मान्यवर – श्री. प्रविण गुल्हाने, सुप्रिया गजभिये, श्री. बागडे, इ., व संस्थेचे कार्यकर्ते, व काही पत्रकार हे देखील उपस्थित होते. 
वाटपासाठी बनवलेले 50 parcels अवघ्या काही मिनीटात संपले. नंतर काही लोकांनी खास परत येउन जेवण आवडले असेही सांगीतले. -
Max Maharashtra, Max Woman वरील “शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला?” या चर्चासत्रात सौ. आरती आमटे – नानकर यांचा सहभाग
Max Maharashtra, Max Woman यांनी आयोजीत केलेल्या “शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला?” या चर्चासत्रात / panel discussion मध्ये आरती (सौ. आरती आमटे – नानकर) सहभागी झाली होती. छान चर्चा झाली. व हे चर्चासत्र खालील link वर उपलब्ध आहे.
शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला? -
काही updates
काही updates.
आस्था प्रकल्पाबद्दल व आस्था भोजनालयाबद्दल –
प्रकल्पाचे व भोजनालयाचे काम व्यवस्थित व नियमीतपणे सुरू आहे. सध्या प्रकल्पात 1 वृध्द गृहस्थ राहत आहेत. इतरही काही जण प्रकल्पात रहायला येतो असे म्हणत आहेत पण वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या तरी प्रकल्पात हे काका एकटेच आहेत. व मागच्या महिन्यात आपण अमरावतीमधील जिल्हा सामान्य रूग्णालयातील (Irwin Hospital मधील) canteen ही चालवायला घेतले आहे, व आस्था भोजनालय तेथे shift केले आहे. आणि आमच्यासाठी ही जागा नवीन असल्यामुळे, घरापासून थोडी लांब आणि जास्त वर्दळीची असल्यामुळे, आणि खर्चही वाढल्यामुळे आम्हाला हे सर्व manage करायला थोडं अवघड होत आहे, पण तरीही काम व्यवस्थित व नियमीतपणे सुरू आहे.
मी हे परत व मुद्दाम हून सांगीतले कारण मागच्या 1-2 महिन्यात आम्हाला हे जाणवले, विशेष करून जाणवले, की काही जणांना (बहुतेक बऱ्याच जणांना) आम्ही हे भोजनालय का सुरू केले आहे, व आमची इतर कामे सोडून आम्ही ते का चालवत आहोत हे नीट लक्षात येत नाही. आणि काही जणांना (बहुतेक बऱ्याच जणांना) असेही वाटते की आम्ही फक्त हे भोजनालयच चालवतो. आमच्यावर प्रेम करणाऱ्या काही जणांनी आम्हाला तस स्पष्टपणे विचारलेही आहे की आम्ही हे भोजनालय का चालवतो? आता इतरांना काय वाटते याने आम्हाला फारसा फरक पडत नाही, पण कोणी स्पष्ट विचारले तर आम्ही उत्तर जरूर देतो. आणि असाच प्रश्न काही दिवसांपूर्वी आमच्या एका स्नेहींनी विचारल्यावर उदयने त्यांना जे उत्तर दिले ते त्यांनाही तर्कसंगत वाटले, पटले व ते थोडक्यात असे होते – हा काही आमचा व्यवसाय नाही. पण हे भोजनालय या प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे व हा प्रकल्प त्याशिवाय चांगल्या रीतीने सुरू राहू शकत नाही. आणि हा प्रकल्प सुरू रहावा, चांगल्या रीतीने सुरू रहावा असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही हे भोजनालय चालवतो.
आमचा प्लॉट, त्यावरील घर व त्यातील प्रकल्पाची जागा –
कर्ज अजून मंजूर झालेले नाही आणि त्यामुळे बांधकामही अजून सुरू झाले नाही. सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव व इतर प्रयत्न सुरू आहेत. व बांधकामही लवकरच सुरू होईल अशी आशा आहे.
इतर –
मागच्या 1-2 महिन्यात काही कौटुंबिक कार्यक्रमांमुळे जवळपास सगळ्याच मित्र मंडळी, नातेवाईक यांच्या बऱ्याच दिवसांनंतर भेटी झाल्या. छान वाटले. मला काही कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची, बोलण्याची, प्रकल्पाबद्दल सांगण्याची संधीही मिळाली. त्यामुळेही छान वाटले पण मी अधिक चांगल्या रीतीने बोलायला, मनातले विचार स्पष्टपणे मांडायला शिकले पाहिजे हेही जाणवले. त्यासाठी आता प्रयत्न करेल.
आणि सध्या इतर काही करायला फारसा वेळच मिळत नाही आहे. पण तरीही जमेल ते, व आवश्यक ते सुरूच आहे.
बाकी सगळे छान. नवीन वर्षासाठी परत एकदा शुभेच्छा.

आस्था भोजनालय आता Irwin Hospital च्या (अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या) Canteen येथे shift झाले आहे. 
आस्था प्रकल्पातील दत्तात्रय नांदूरकर काका. त्यांना व्यवस्थित दिसत नाही तरी शक्य त्या कामात मदत करण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात. 
हेमलकसा येथील 5 km ची लोक बिरादरी Hemalkasa Marathon Race मध्ये मी आणी श्री ने ही भाग घेतला, पुर्णही केली. 
Max Woman, Max Maharashtra तर्फे आयोजीत शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला या चर्चासत्रात मी भाग घेतला. बहुतेक पहिल्यांदाच.
https://fb.watch/hR61vnXplv/?mibextid=2Rb1fB
https://www.youtube.com/watch?v=GvU73EnAnLo
बडनेरा येथील एका महिला समुपदेशन केंद्राच्या उद्याटनाच्या कार्यक्रमाही सहभागी झाली होती. 
काही दिवसांपुर्वीच्या एका कार्यक्रमासाठी आस्था भोजनालयाने पुरवलेले 50 लोकांचे जेवण. 
आस्था प्रकल्पातील बगीचा, फुले. काही updates -

2 दिवसीय उषा शिलाई स्कूल प्रशिक्षणाचा कार्यक्रम
27 व 28 तारखेला (27 – 28 November 2022) USHA, AFARM व आपल्या संस्थेने आयोजीत केलेला 2 दिवसांचा शिलाई प्रशिक्षणाचा कार्यक्रम आस्था भोजनालय, यशोदा नगर, अमरावती येथे पुर्ण झाला.
कार्यक्रमात 20 महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. USHA तर्फे आलेल्या भंडारा येथील master trainer वर्षा मते यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्षात उपयोगात येईल अशा पध्दतीने शिकवले. ते सगळ्यांना आवडले.
आणि समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून माझ्या जिवलग मैत्रिणी डॉ. मिनाक्षी व्यवहारे (Minakshi Mendhe Vyawahare) व सौ. आरती देशमुख (Aarti Deshmukh) या उपस्थित राहील्या, त्यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. व एकंदरीत हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम छान पार पडला.





डॉ. मिनाक्षी व्यवहारे व सौ. आरती देशमुख यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. -
निराधार व गरजूंना जगण्याची उमेद देणारी आस्था
आपल्या आस्था भोजनालयात जेवायला येणाऱ्या दोन युवा reporters ला आपल्या आस्था प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली व त्यांना त्याबद्दल story कराविशी वाटली म्हणून त्यांनी आमची मुलाखतही घेतली. छान झाली. आम्हाला आवडली.
जमल्यास पहाल. आवडल्यास share ही कराल.
Thank you Harsh and Rohit Panvatkar.


