काल JCI अमरावतीच्या एका कार्यक्रमात काही महीलांचा, त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यात आला. यात आपल्या आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे कामामुळे माझाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम छान झाला. JCI च्या members ला, मैत्रिणींना भेटून, त्यांच्याशी बोलून छान वाटले.
आपले आस्था भोजनालय सुरू करून या 28 तारखेला 1 वर्ष होत आहे. आणि आपल्या आस्था या निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पालाही सुरू होउन जवळपास 1.5 वर्ष होत आहेत. त्यामुळे या दोघांबद्दल काही updates.
आस्था निवासी प्रकल्पाचा फायदा आतापर्यंत एकूण 10 लोकांना (8 पुरूष व 2 महिला यांना) झाला आहे, होत आहे. व सध्या आपल्या प्रकल्पात 7 लोक (6 पुरूष व 1 महिला) राहत आहेत. प्रकल्पातील वातावरण आनंदी आहे. सगळ्यांच्याच तब्येती ठीक आहेत. आणि प्रकल्पात राहण्यासाठी अत्यावश्यक अश्या जवळपास सर्व सोयी सुविधा झाल्या आहेत. काही गोष्टींची अजून आवश्यकता आहेच, प्रकल्पासाठी स्वतःची जागा देखील बाकी आहे, पण त्या गोष्टी तितक्याश्या urgent नाही.
आस्था भोजनालयाने या वर्षभरात प्रकल्पातील रहिवाशी, कार्यकर्ते, पाहूणे, customers, इ. सर्वांचे मिळून जवळपास 11000 meals (जेवणाची ताट) serve केली आहेत. व येथील जेवण जवळपास या सर्वांनाच आवडले आहे. आस्था भोजनालयाने लहान मोठ्या कार्यक्रमांंच्या एकूण 24 catering च्या orders पुर्ण केल्या आहेत (त्यापैकी 1 order वगळता, इतर सर्व customers आपल्या येथील जेवणाने, service ने खुश झाले आहेत). आस्था भोजनालयाने आजपर्यंत एकूण 316015 ₹ चे उत्पन्न मिळवले आहे (पण हा फक्त revenue आहे, फायदा नक्कीच नाही कारण सध्या तरी खर्च यापेक्षा बराच जास्त आहे). आणि आपल्या प्रकल्पातील जवळपास सगळ्यांनाच ते करू शकतील असे काम, व सन्मानाने आणि आनंदाने जगता येण्याची संधी, आस्था भोजनालयाने पुरवली आहे.
खरतर आस्था प्रकल्पाशी व आस्था भोजनालयाशी संबंधीत हे सर्वच आकडे खुपच छोटे आहेत. पण गेल्या वर्षभरातील परिस्थिती, उपलब्ध resources, इतर जवाबदाऱ्या या सगळ्यांचा विचार करता मी, आम्ही सर्वच, या आकड्यांनी व प्रकल्प आणि भोजनालय गेल्या 1 वर्षापासून सातत्याने सुरू आहे म्हणून खुश आहोत, समाधानी आहोत व येणाऱ्या वर्षाबद्दल आशावादी आहोत. आणि आपल्या या प्रकल्पाला, भोजनालयाला, आम्हाला मदत व मार्गदर्शन करणाऱ्या, करत असलेल्या सर्वांचे, ज्यांचे आमच्याकडे photo नाहीत, add करायचे राहून गेले त्या सर्वांचेही, मनापासून आभारी आहोत.
उषा इंटरनॅशनल, अफार्म व स्वच्छ बहुउद्देशीय संस्था (Swachha Bahuuddeshiya Sanstha) अमरावती यांनी मिळून आयोजीत केलेल्या उषा शिलाई स्कूल (Usha Silai School) या 9 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोपाचा कार्यक्रम दि. 14 डिसेंबर 2021 रोजी, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रशिक्षणासाठी कार्यक्रमाच्या निकषांनुसार अमरावती जिल्ह्यातील 10 गरजू महिलांची निवड करण्यात आली होती. या सर्व महिलांनी या प्रशिक्षणादरम्यान शिवणकाम, उषा शिलाई मशीनची दुरूस्ती, व्यवसाय कौशल्ये, इ. विवीध गोष्टींचे प्रशिक्षण घेतले. व कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी या सर्व दहाही महीलांना त्यांनी प्रशिक्षणादरम्यान स्वतः जोडून तयार केलेले प्रत्येकी 1 शिलाई मशीन त्यांच्या स्वतःच्या व्यवसायासाठी व त्यांनी इतर महीलांना प्रशिक्षीत करावे यासाठी देण्यात आले. आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाला विवीध सामाजीक कार्यांना मदत व मार्गदर्शन करणारे श्री. म. ल. नानकर (Madhukar Nankar) व सौ. सुमन नानकर, श्री. लक्ष्मीकांत वरणगावकर (Laxmikant Varangaonkar), श्री. प्रविण गुल्हाने (Pravin Gulhane), डॉ. मधुकर गुंबळे (Madhukar Gumble), श्री. भागवत साहेब, श्री. जगदीश हे सर्व मान्यवर उपस्थीत होते. व या प्रशिक्षणाचा व या महीलांना मिळालेल्या शिलाई मशीनचा वापर या सर्व महीला उत्तम रितीने करतील असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केला व प्रशिक्षणार्थी महीलांना यासाठी शुभेच्छाही दिल्या. हा निवासी प्रशिक्षणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उषा इंटरनॅशनलच्या श्री. परेश नागपूरे व श्री. राजेश हटवार व प्रशिक्षक श्रीमती वर्षा मते यांनी, अफार्म संस्थेच्या श्री. विनायक गारडे यांनी, व स्वच्छ बहुउद्देशीय संस्थेच्या आरती आमटे-नानकर (Arti Amte – Nankar) व उदय नानकर (Uday Nankar) व संस्थेच्या इतर सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यासाठी या सर्वांचे प्रशिक्षणार्थी महिलांनी आभार मानले व त्यांना मिळालेल्या या संधीचे सोने करू असा विश्वास व्यक्त करत या प्रशिक्षणार्थी महीलांनी या कार्यक्रमाचा समारोप केला.
आपण आयोजीत केलेल्या उषा शिलाई स्कूल या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात मोठ्या बाबांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आली. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक महिलेने आपले शिलाई मशीन जोडून प्रशिक्षणाला सुरवात करायची आहे. कार्यक्रमाला उषा इंटरनॅशनलचे श्री. परेश नागपूरे हे उपस्थित होते. व कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक महिलेला 1 शिलाई मशीन व तिच्या घराबाहेर लावण्यासाठी उषा शिलाई स्कूल चा 1 बोर्ड व प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.या शिलाई मशिनचा व या प्रशिक्षणाचा या महिलांना चांगला उपयोग होईल अशी आम्हाला आशा आहे.
मी आत्ता हे लिहण्यापूर्वी आपल्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाबद्दल याआधी केव्हा व काय लिहिले होत ते पहात होते तेव्हा मला लक्षात आल की या प्रकल्पाबद्दल मी जवळपास 5 महिन्यांच्या नंतर काहीतरी लिहित आहे. खुप आश्चर्य वाटलं, आणि थोडं वाईटही. आश्चर्य यासाठी वाटलं की जरी इतक्या दिवसात या प्रकल्पाबद्दल मी काही लिहल नाही तरी, मधल्या काही दिवसांचा अपवाद सोडल्यास, जवळपास रोजच माझे कोणा ना कोणाशी या प्रकल्पाबद्दल काही ना काही बोलणं होतच आहे. आणि वाईट यासाठी वाटलं की आपलं हे काम देखील फारच हळू हळू सुरू आहे हे आज परत एकदा प्रकर्षाने जाणवलं, आणि ठरवून देखील प्रकल्पाबद्दलचे नियमित updates देऊ शकलो नाहीत म्हणूनही.
पण तरीही आनंद याचा आहेच की काम, हळू हळू का असेना पण, सुरू आहे.
तर प्रकल्पाबद्दलचे काही updates –
आम्ही प्रकल्पाचे नाव ठेवले. नावाबद्दल बरीच चर्चा झाली, बरीच नाव सुचवली गेली, सगळीच छान होती पण त्यापैकी हे नाव ठेवले (आणि हे नाव अनु दादाने सुचवलेले आहे). प्रकल्पाचे नाव: आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प.
प्रकल्पासाठी भाड्याने घेतलेल्या नवीन जागेत आम्ही रहायला आलो. तेथे काही अत्यावश्यक सोयी – सुविधा केल्या, पण अजून बऱ्याच शिल्लक आहेतच.
प्रकल्पाचा भाग म्हणून सुरू करायची होती ती खानावळ देखील सुरू झाली (28 जानेवारी 2021 ला, पण उद्घाटनाचा कार्यक्रम मात्र अजून बाकी आहे). खानावळीचे नाव: आस्था भोजनालय (भोजनालयाचा पत्ता आणि इतर माहिती https://maps.app.goo.gl/vffrGLvN6rgc6XuJ9 येथे व Aastha Bhojanalaya येथे पाहता येईल, आणि ही खानावळ असली तरीही इथले जेवण मात्र छान आहे, त्यामुळे जेवणासाठी नक्की याल, order कराल).
प्रकल्पासाठी मदत निधी म्हणून आम्ही जमा करण्याचा प्रयत्न करत होतो तेवढी रक्कम जमा झाली नाही (पण हळू हळू होईलही). त्यामुळे थोड्या अडचणी येत आहेत. आणि प्रकल्पाचे काढलेले budget व सध्याचा खर्च यात सध्या तरी बरीच तफावतही आहे. पण काम सुरू आहे, आणि अजून काही महिन्यांनंतर व प्रकल्पाच्या लाभार्थ्यांची संख्या 20 झाल्यानंतर budget, expenditure व revenue यातील ही तफावत कमी होईल अशी आम्हाला आशाही आहे.
आणि या व्यतिरिक्तही बरेच updates आहेतच. बरेच वेगवेगळे अनुभव येत आहेत. कधीकधी अगदी ‘आता काय करायचे?’ किंवा ‘आपण काही चुकीचे तर करत नाही आहोत ना?’ असे प्रश्नही पडतात, कधीकधी खुप काळजीही वाटते. पण या सोबतच खुप साऱ्या चांगल्या गोष्टीही घडत आहेतच. आणि सध्या आम्ही अगदी थकून जात असलो तरीही, आम्हाला वेळ अगदी अपुरा पडत असला तरीही, आम्ही खुप आनंदी आहोत.