उषा शिलाई शाळा हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाला

उषा इंटरनॅशनल, अफार्म व स्वच्छ बहुउद्देशीय संस्था (Swachha Bahuuddeshiya Sanstha) अमरावती यांनी मिळून आयोजीत केलेल्या उषा शिलाई स्कूल (Usha Silai School) या 9 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोपाचा कार्यक्रम दि. 14 डिसेंबर 2021 रोजी, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रशिक्षणासाठी कार्यक्रमाच्या निकषांनुसार अमरावती जिल्ह्यातील 10 गरजू महिलांची निवड करण्यात आली होती. या सर्व महिलांनी या प्रशिक्षणादरम्यान शिवणकाम, उषा शिलाई मशीनची दुरूस्ती, व्यवसाय कौशल्ये, इ. विवीध गोष्टींचे प्रशिक्षण घेतले. व कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी या सर्व दहाही महीलांना त्यांनी प्रशिक्षणादरम्यान स्वतः जोडून तयार केलेले प्रत्येकी 1 शिलाई मशीन त्यांच्या स्वतःच्या व्यवसायासाठी व त्यांनी इतर महीलांना प्रशिक्षीत करावे यासाठी देण्यात आले. आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाला विवीध सामाजीक कार्यांना मदत व मार्गदर्शन करणारे श्री. म. ल. नानकर (Madhukar Nankar) व सौ. सुमन नानकर, श्री. लक्ष्मीकांत वरणगावकर (Laxmikant Varangaonkar), श्री. प्रविण गुल्हाने (Pravin Gulhane), डॉ. मधुकर गुंबळे (Madhukar Gumble), श्री. भागवत साहेब, श्री. जगदीश हे सर्व मान्यवर उपस्थीत होते. व या प्रशिक्षणाचा व या महीलांना मिळालेल्या शिलाई मशीनचा वापर या सर्व महीला उत्तम रितीने करतील असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केला व प्रशिक्षणार्थी महीलांना यासाठी शुभेच्छाही दिल्या. हा निवासी प्रशिक्षणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उषा इंटरनॅशनलच्या श्री. परेश नागपूरे व श्री. राजेश हटवार व प्रशिक्षक श्रीमती वर्षा मते यांनी, अफार्म संस्थेच्या श्री. विनायक गारडे यांनी, व स्वच्छ बहुउद्देशीय संस्थेच्या आरती आमटे-नानकर (Arti Amte – Nankar) व उदय नानकर (Uday Nankar) व संस्थेच्या इतर सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यासाठी या सर्वांचे प्रशिक्षणार्थी महिलांनी आभार मानले व त्यांना मिळालेल्या या संधीचे सोने करू असा विश्वास व्यक्त करत या प्रशिक्षणार्थी महीलांनी या कार्यक्रमाचा समारोप केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *