10 गरजू विद्यार्थ्यांसाठी रोज सायंकाळचे मोफत पोटभर जेवण

आम्ही आपल्या आस्था निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे सगळे काम व्यवस्थित होत नाही तो पर्यंत इतर कुठला नवीन कार्यक्रम सुरू करायचा नाही असे ठरवले होते / आहे. पण यादरम्यान काही संधी उपलब्ध झाल्यास त्याबद्दल विचार करून ठरवूया असेही ठरवले होते / आहे. आणि काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील एका दुसर्‍या संस्थेमार्फत आम्हाला काही गरजू विद्यार्थ्यांना व इतर काही जणांना नियमीतपणे जेवण पुरवण्या संदर्भात मिळून काही कार्यक्रम करता येईल का अशी विचारणा झाली होती. त्यानुसार आम्ही काय करता येईल, लाभार्थ्यांची निवड कशी करता येईल, त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील, अंदाजे किती खर्च होईल, इ. गोष्टींवर विचार करून एक रूपरेषा त्यांच्यासमोर मांडली. चर्चा छान झाली. पण कदाचित आम्ही काढलेला खर्च त्यांना जास्त वाटला असेल किंवा इतर काही कारण असेल पण पुढे मात्र काही ठरले झाले नाही व त्यांच्यासोबतचा हा कार्यक्रम सुरू झाला नाही.

आणि खर्चाची व्यवस्था करणे अवघड असल्यामुळे आम्हीही त्यावर पुढे फारसा विचार केला नाही. पण मनातून तो विचार गेलाही नाही. व आपल्या भोजनालयात अधूनमधून विद्यार्थी half tiffin (कमी पैशात mess) बद्दल चौकशी करत होतेच.

आणि योगायोगाने काल सकाळी उदयने आपण स्वत:च हा कार्यक्रम सुरू करूया, पण छोट्या प्रमाणात, असे सुचवले. आम्ही परत सगळा विचार केला. इतर सर्व ठीक आहे पण खर्चाची व्यवस्था करणे अजूनही अवघडच वाटत आहे. पण तरीही आम्ही 1 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू करत आहोत व किमान 1 वर्ष तरी हा कार्यक्रम सुरू ठेवूया असे सध्या ठरवले आहे. व या कार्यक्रमाचा या 10 विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व indirectly काही प्रमाणात तरी आपल्या आस्था प्रकल्पालाही फायदा होईल असे वाटत आहे. काय होते ते लवकर समजेलच.

तुम्हाला कोणाला या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, या कार्यक्रमासाठी काही मदत करायची असल्यास, आमच्याशी नक्कीच संपर्क साधाल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *